आपलं महानगर
मुंबईत शौचालयांची कमतरता प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात पोलखोल
मुंबई: मुंबई शहर हागणदारीमुक्त झाल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून अलीकडेच करण्यात आला होता. मात्र प्रजा फाऊंडेशन या संस्थेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या नागरी सेवासुविधा बाबतच्या अहवालात मुंबईतील शौचालयांची व तेथील सेवासुविधांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याची पोलखोल केली आहे. मुंबईत वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची व शौचकूपांची संख्या कमी आहे. त्यामुळे २०२४ मधील माहितीनुसार, महापालिकेच्या ए आणि बी वॉर्डच्या शौचालयांमधील दर ४ सार्वजनिक शौचकुपांपैकी ३ शौचकूपांचा वापर पुरुषांकडून तर फक्त एकाचा वापर महिलांकडून केला जात असल्याची विदारक माहिती समोर आली आहे