सनातन प्रभात
मागील १० वर्षांत बलात्कार आणि विनयभंग घटनांमध्ये दुपटीहून वाढ ! मुंबईतील महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण चिंताजनक !
वर्ष २०१३ - २०२२ या १० वर्षांच्या काळात मुंबईतील बलात्कार आणि विनयभंग यांच्या घटना दुपटीहून अधिक वाढल्या आहेत. वर्ष २०१३ मध्ये मुंबईत बलात्काराच्या ३९१ घटना घडल्या होत्या, तर विनयभंगाच्या १ सहस्र १३७ घटना होत्या. त्यामध्ये अनुक्रमे ९०१ आणि २ सहस्र ३२९ इतकी म्हणजे दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.