Loksanwadnews
प्रज्ञा फाऊंडेशनच्या मुंबई नागरी सेवा बाबत सद्य स्थिती अहवाल चे प्रकाशन.
मुंबईत साधारणपणे दर दिवशी दरडोई सरासरी 188 लिटर (एलपीसीडी - लिटर पर कॅपिटा पर डे) पाणी पुरवठा होतो, जो 135 एलपीसीडी या भारतीय मानकापेक्षा अधिक आहे. मात्र बिगर-झोपडपट्टी क्षेत्राला 150 एलपीसीडी पुरवठा होतो, तर झोपडपट्टी क्षेत्रात मीटर जोडणीच्या द्वारे 45 एलपीसीडी पुरवठा होतो.