Prahar
कोरोना काळात मूलभूत सुविधा देण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्या वेळेपासून प्रत्येक जण कोरोनाविरोधात लढा देत आहेत ; परंतु याच कोरोना संकटात करदात्या मुंबईकरांना पायाभूत सुविधा देण्याकडे मुंबई महापालिकेने दुर्लक्ष केले, असा अहवाल मंगळवारी प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध केला आहे.