Vruttamanas
कोविड काळात मुंबई महानगरपालिकेने केलेले काम कौतुकास्पद - प्रजा फाऊंडेशन

2020 हे सर्व जगासाठीच एक आव्हानात्मक वर्ष होते. शहरी भागात कोविड-19 महामारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली, मुंबईही याला अपवाद नव्हते. कोविडकाळात मुंबई महानगरपालिकेने प्रशंसनीय काम केले, असे प्रजाचे मत आहे. या काळात महानगरपालिकेने विविध उल्लेखनीय उपक्रम हाती घेतले, असे प्रजाच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य निताई मेहता यांनी म्हटले.